जनता कर्फ्यू 17 तारखेपर्यंत कायम ठेवावा रवि पाटील तालुका अध्यक्ष अमळनेर देवा गृप फाऊंडेशन
अमळनेर-रेड झोनमध्ये असणाऱ्या जळगाव जिल्ह्यात विशेषत: आपल्या अमळनेर शहरातील कोरोना पाॅझिटीव रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अमळनेरातील लोकप्रतिधी व नागरिकांनी राबविलेला जनता कर्फ्यु सतरा मे पर्यंत कायम ठेवावा अशी मागणी धार गावाचे मा.उपसरपंच तथा देवा गृप फाऊंडेशन अमळनेर तालुका अध्यक्ष रवि पाटील यांनी केली आहे.
अमळनेर शहरातील कोरोणा पाॅझिटीव रुग्णांची संख्या 105 झाली असुन हि शहरी व ग्रामीण भागासाठी अतिशय चिंतेची बाब आहे.म्हणुन कोरोणा संसर्गाची साखळी तोडायची असल्यास जनता कर्फ्यु अजुन 17 मे पर्यंत वाढविणे हा उत्तम पर्याय आहे.
यामुळे शहरातील लोक ग्रामीण भागात जाऊ शकत नाही व ग्रामीण भागातील लोक शहरात येऊ शकत नसल्याने शहरातील साखळी तुटुन ग्रामीण भागातील असणारा संक्रमणाचा धोका टळणार आहे.जिवापेक्षा काहीच मोठे नसुन सध्य परिस्थितीत खाण्यापिण्या संदर्भातील आपला अट्टाहास सोडुन घरात असेल त्या गोष्टींनी आपली भुक भागवुन आपल्या परिवाराच्या व आपल्या तालुक्याच्या हितासाठी हा जनता कर्प्यु वाढवावा.आता दाखविलेल्या संयमामुळे आपल भविष्य हे सुरक्षित व आनंदी असणार आहे. तसेच आरोग्य खाते,पोलिस खाते,नगरपालिका कर्मचारी,पंचायत समिती कर्मचारी,महसूल कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आवाहन देवा गृप फाऊंडेशन अमळनेर तालुका अध्यक्ष रवि पाटील यांनी केले आहे.






