Maharashtra

बारामतीतील कोरोनाबधित रुग्णाच्या नातेवाईकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

बारामतीतील कोरोनाबधित रुग्णाच्या नातेवाईकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

प्रतिनिधी-आनंद काळे

बारामती- कोरोनाग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे दिलासादायक वृत्त आहे.बारामतीतील भिगवण रस्त्यावरील एक रिक्षाचालक कोरोनाबधित रुग्ण आढळून आल्याने बारामती व इंदापूर परिसरात खळबळ उडाली होती.
त्याचबरोबर बारामतीपासून अवघ्या 50 किलोमीटरवर इंदापूर रस्त्यावर असणाऱ्या अंथुणे गावाजवळ राज्यमंत्री दत्तामामा भरणे ह्यांच्या गावाजवळील भवानीनगर,वॉलचंनगर येथून बारामतीला येण्याजाण्यासाठी वर्दळ जास्त असते,त्यामुळे सर्व गावांचे धाबे दणाणले होते.
दरम्यान, त्या रुगण्याच्या संपर्कातील आठ नातेवाईकांचे नायडू हॉस्पिटलमध्ये नमुने तपासणीसाठी घेतले होते त्या आठ नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे वृत्त आहे.त्यामुळे बारामतीकरासह इंदापुरकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.सद्यस्थितीत बारामतीत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे.बारामतीतील जनतेने घराबाहेर पडू नये असे प्रशासनसारखे आव्हान करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button