Chalisgaon

चाळीसगाव येथे होणाऱ्या जलसंमेलनाला उपस्थित रहावे : भूजल अभियानाचे गुणवंत सोनवणे यांचे आवाहन…..

चाळीसगाव येथे होणाऱ्या जलसंमेलनाला उपस्थित रहावे : भूजल अभियानाचे गुणवंत सोनवणे यांचे आवाहन…..

प्रतिनिधी : सोमनाथ माळी


चाळीसगाव : तालुक्यात मागील वर्षी शिवनेरी फाऊंडेशन संचलित भूजल अभियानाअंतर्गत जवळपास सोळा गांवामध्ये जलसंधारणाचे काम करण्यात येऊन पहिल्याच पाऊसात कोट्यावधी लिटर जलसाठा निर्माण झाला तालुक्यातील ब्राम्हणशेवगे,रांझणगाव, नाईकनगर,अभोणे,जामदा, बाणगाव, चैतन्य नगर, सुंदर नगर आदि गावांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन असतांना शेतकरी बांधवांनी भारावल्यागत कधी हात उसने तर कधी कर्ज काढून लोकसहभागातून आपल्या शेतालगत असलेले मातीनाला बांध खोलीकरण करून घेत एक आगळे -वेगळे प्रेरणादायी असे उदाहरण जनतेसमोर उभे केले आहे. वरुण राजाने ही यावर्षी चांगली मेहरबानी केल्याने कष्टाचे पहिल्या पावसात फलीत पहायला मिळाले. असे काम ना भूतो ना भविष्यती झाल्याने या कामासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या जलयोध्दयाचा यथोचित सन्मान व्हावा तसेच ईतर गावांना प्रेरणा मिळावी यासाठी चाळीसगाव चे लाडके आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली शिवनेरी फाऊंडेशन संचलित भूजल सहज जलबोध अभियान अंतर्गत खांन्देशस्तरीय पहिले जलसंमेलन चाळीसगाव येथील राजपूत मंगल कार्यालयात रविवार दि.8/11/2020 सकाळी 9:30 वा आयोजित करण्यात आले आहे. या जलसंमेलनास जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत,जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बि.एन.पाटील, ईडीचे सह आयुक्त डॉ. उज्ज्वल कुमार चव्हाण,GSDA नाशिक चे उपसंचालक दिवाकर धोटे, भूजल तज्ञ अनुराधा पाटील जळगाव,सहज जलबोध अभियानाचे उपेंद्र धोंडे,जिल्हा क्रुषीउपसंचालक,जळगावचे अनिलभोकरे,एस.एन.पाटील,जिआँलाँजि डिपार्टमेंट जळगाव आदी मान्यवर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या अविस्मरणीय अशा पहिल्या जल संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे तसेच येताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने मास्क लावणे गरजेचे आहे व सोशल डिस्टन्सचे नियम पाळावे असे आवाहन भुजल अभियानाचे गुणवंत सोनवणे यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button