?️अमळनेर कट्टा..धक्कादायक..!युनियन बँक कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या..!पोलिसात गुन्हा दाखल..!
अमळनेर पोस्टे अमृ सीआरपीसी 174 प्रमाणे
अमळनेर येथील युनियन बँक कर्मचारी सागर पाटील याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे या बाबत सविस्तर वृत्त असे की युनियन बँकेत सागर एकनाथ पाटील वय 28 रा नायगाव ता यावल ह मु सुरभी कॉलनी अमळनेर हाँ सब स्टाफ म्हणुन कामास होता आज दि 5.6.2021 रोजी सकाळी 10.30 वाजेचे सु।।स मी नेहमी प्रमाणे बँकेत बँकेतील कर्मचारी सागर एकनाथ पाटील वय 28 हा दिसला नाही म्हणुन बँक मॅनेजर ने त्यास फोन केला असता त्याने फोन उचलला नाही त्यानंतर बँकेत काम करीत असतांना दुपारी 12.30 वाजेचे सु।।स सागर याचा डाबा देणारा प्रसाद राजेद्र बाविस्कर
याने येवुन सांगितले की सागर एकनाथ पाटील याने राहते घरी डबा देणेसाठी गेलो असता त्याचे घराचा दरवाजा बंद असल्याने आवाज दिल्याने त्याने काहीएक प्रतीसाद न दिल्याने त्याचे घराचे खिडकीद्वारे पाहीले असता सागर हा त्याचे
घराचे पंख्याचे बाजुस असलेल्या हुकास नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला दिसला असे कळविल्याने बँक मॅनेजर यांनी लागलीच पोलीस स्टेशनला फोन द्वारे कळविले त्यानंतर बँक मॅनेजर,सुरेश पुंडलीक न्हावी व किशोर साहेबराव सोनवणे असे सागर याचे राहते घरी गेलो असता आम्ही खिडकीतुन पाहीले असता तो त्याचे राहते घराते पंख्याचे बाजुस असलेल्या हुकास नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला दिसला त्यानंतर लागलीच पोलीस आल्याने पोलीसांनी तेथील लोकांचे मदतीने सागर याचे राहते घराचे दरवाजाला असलेली जाळी तोडुन दरवाजाची मधुन लावलेली कडी उघडुन आत प्रवेश करुन सागर यास लोकांचे मदतीने त्याचे गळ्यातील दोरी कापुन खाली उतरखुन त्यास अमळनेर ग्रामिण रुग्णालय येथे दाखल केले असुन डाँ नी सागर यास तपासुन मयत घोषित केले.सदर घटनेची फिर्याद बँक मॅनेजर अजय शुक्ला यांनी दाखल केली असून पुढील तपास पोहेकाँ 1990 ठाकरे करीत आहेत






