Maharashtra

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचा जळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन मिटींग संपन्न

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचा जळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन मिटींग संपन्न

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष बैठक शक्य नसल्याने कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचा जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची पहिलीच बैठक नुकतीच ऑनलाइन पद्धतीने “गुगल मिट” अँप चा सहाय्याने संपन्न झाली.सदर ऑनलाइन बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे,महाराष्ट्र प्रदेश संघटक श्रीकांत राजपूत,उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष निखिल पवार यांचा मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष ऊल्केश साळुंखे,युवती जिल्हाध्यक्ष कोमल पाटील,जिल्हा उपाध्यक्ष ऋषी पाटील,जिल्हा सचिव परेश पालीवाल,जिल्हा संघटक किरण सरताळे आदी जिल्हा पदाधिकारी तसेच तालुका पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी जळगाव जिल्ह्यात संघटना वाढीसाठी कोणती ध्येय धोरणे राबवता येतील त्याची सविस्तर माहिती देत जिल्हा तालुका पदाधिकार्यांचा सूचना यावेळी संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे यांनी जाणून घेतल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button