Thane

प्रतिबंधित क्षेत्रात कठोर अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांचे आदेश नौपाडा-कोपरी प्रभागातील प्रतिबंधित क्षेत्राची केली पाहणी

प्रतिबंधित क्षेत्रात कठोर अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांचे आदेश
नौपाडा-कोपरी प्रभागातील प्रतिबंधित क्षेत्राची केली पाहणी

पी व्ही आंनद

Thane, हॅाट स्पॅाट आणि प्रतिबंधित क्षेत्रात कठोर अंमलबजावणी करतानाच त्यामधील प्रत्येक नागरिकांची फिव्हर आणि ॲाक्सीजनची चाचणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.
आज श्री. सिंघल यांनी नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतंर्गत नागसेन नगर, खारटन रोड आणि त्यानंतर चेंदणी कोळीवाडा प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागसेन नगरमध्ये कोणत्या ठिकाणी बाधित रूग्ण सापडले आहेत,

त्यांच्यापासून इतर कोणाला लागण झाली आहे आणि त्याची साखळी कशी तोडता येईल याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी नागसेननगर येथील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून रोज चार ते पाच वेळा सोडियम हायपोक्लाराईटने स्वच्छता केली जाते का याची चौकशी केली.

नागसेननंतर महापालिका आयुक्तांनी चेंदणी कोळीवाडा प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी या क्षेत्राची लोकसंख्या, त्यातील किती लोकांची तपासणी केली आहे आणि किती लोकांना औषधे देण्यात आली आहेत याची बारकाईने चौकशी केली. या पाहणी दौऱ्यात श्री. सिंघल यांनी प्रतिबंधित क्षेत्रात कठोर अंमलबजावणी करण्यात यावी असे सक्त आदेश दिले. यावेळी परिमंडळ उपायुक्त संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त श्रीमती प्रणाली घोंगे, कार्यकारी अभियंता प्रदीप घाटगे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button