Pandharpur

पंढरपुरातील गरजू परीट समाज बांधवांना  मनसेची मदत

पंढरपुरातील गरजू परीट समाज बांधवांना मनसेची मदत

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर तालुक्यातील लाऊकडाऊनमुळे बाराबलुतेदारांच्या अनेक छोट्या व्यवसायांवर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे.गेल्या दोन महिन्यांपासून धोबी (परीट) व्यवसायाला देखील घर घर लागली आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेले परीट समाजातील तरुणांवर आर्थिक संकट ओढवले आहे.आर्थिक संकटात सापडलेल्या पंढरपुरातील गरीब व गरजू धोबी व्यवसायिकांना आज मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या वतीने अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. परीट समाजाचे नेते धनंजय घोडके यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले.कोरोनामुळे जगाचे चक्र थांबले आहे.

याची झळ प्रत्येक छोट्या व्यवसायिकांपर्यंत बसू लागली आहे.याचा सर्वाधिक फटका बाराबलुतेदार व्यवसायिकांना बसला आहे. हातावरचे पोट असणारे अनेक छोटे व्यवसायिकांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये परिसमाजाकील धोब्याचा आणि ईस्त्रीचा व्यवसाय करणाऱ्या अनेक तरुणांना बसला आहे. व्यवसायच ठप्प असल्याने पंढरपूर शहरातील परीट समाजातील अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. व्यवसायच बंद असल्याने परीट समाजातील गरीब व गरजू कुटुंबांची सध्या उपासमार सुरु आहे.अशा कुटुंबाना आज मनसेेच प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी गहू,तांदुळ,साखऱ, तेल आदीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.या वेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपप्रमुख महेश पवार, अर्जून जाधव, सागर घोडके, कृष्णा मासाळ,समाधान डुबल, परीट समाजाचे उध्दव घोडके, अरुण घोडके,चंद्रकांत घोडके आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button