ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या तालुकाध्यक्ष पदी सदाशिव पावर तर सचिव पदी राजेश साळुंके यांची निवड..
अमळनेर येथे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन ची बैठक संपन्न झाली.या बैठकीत जळगांव जिल्यातील ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष रवींद्र बारेला,उपाध्यक्ष प्रा जयश्री दाभाडे,सल्लागार गजमल पवार, सचिव प्रकाश वसावे,महिला संघटक शिला बारेला इ उपस्थित होते. यावेळी अमळनेर तालुक्यातील शासकीय निम शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या, प्रश्न इ संदर्भात चर्चा करण्यात आली. त्याच प्रमाणे संघटना बांधणी,संघटनात्मक कार्य इ संदर्भात देखील सर्व समावेशक चर्चा करण्यात आली.
या बैठकीत अमळनेर तालुक्याच्या ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या तालुकाध्यक्ष पदी मंगरूळ येथील जिल्हा परिषद शिक्षक सदाशिव पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच सडावन येथे कार्यरत असलेले जिल्हा परिषद शिक्षक राजेश साळुंके यांची सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडी नंतर तालुक्यातील इतर शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेच्या उपाध्यक्षा प्रा जयश्री दाभाडे यांनी दिली आहे.यावेळी नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष प्रा जयश्री दाभाडे आणि महिला संघटक शिला बारेला यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी सल्लागार गजमल पवार हे होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संघटनेच्या विविध कार्याचा आढावा घेतला.यावेळी सल्लागार प्रा के के वळवी यांनी आपल्या मनोगतात कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या प्रश्नांसाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटना बांधील आहे असे आश्वासन दिले.तर सचिव प्रकाश वसावे यांनी देखील मनोगत व्यक्त करत संघटनेच्या विस्ताराची कामांची माहिती दिली.
यावेळी अमळनेर तालुक्यातील शासकीय निम शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदीप चव्हाण,सुरेश सोळंके,राजेंद्र चव्हाण, ओंकार चव्हाण, मनिराम भोये,रमेश उग्रवण्या,राजेंद्र बारेला, डॉ, जयेश पाडवी, भाऊराव सोनवणे,उदयसिंग भिल,शिवाजी पारधी,मनोज पवार,पुनमचंद पारधी इ आदिवासी बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदीप चव्हाण यांनी केले.






