Amalner

औषध विक्रेता संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत पाटील तर सचिवपदी सचिन चोपडा यांची निवड..

औषध विक्रेता संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत पाटील तर सचिवपदी सचिन चोपडा यांची निवड..

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत पाटील तर सचिवपदी सचिन चोपडा यांची निवड करण्यात आली आहे. तसेच खजिनदारपदी प्रवीण माळी व जिल्हा ई सी मेंबर म्हणून मिलिंद डेरे यांची निवड करण्यात आली.
औषध विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकार्यकारिणीची सभा संपन्न झाली.या सभेत अमळनेर तालुका अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

या वेळी ज्येष्ठ जिल्हा प्रतिनिधी म्हणून मुरलीधर चौधरी, सुनील छाजेड, सदानंद पाटील उपस्थित होते. जिल्हा संघटनेच्या आदेशानुसार तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष मुकेश शहा, निलेश पाटील, रवींद्र चौधरी,
प्रदीप पाटील, सहसचिव अमोल पिंगळे, सहखजिनदार प्रदीप पाटील, संघटन सचिव राकेश चौधरी, ग्रामीण संघटन सचिव अमोल पाटील पीआरओ अमोल परदेशी, रिटेल हित कमिटी प्रशांत पारेख तालुका ई सी भुषण पाटील विशाल महाजन यांची निवड करण्यात आली आहे.सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

संबंधित लेख

Back to top button