Chalisgaon

१ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुधआंदोलन… महायूतीचा एल्गार

१ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुधआंदोलन… महायूतीचा एल्गार

दुध उत्पादकांना सरसकट १० रूपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो ५० रूपये अनुदान मिळायलाच पाहिजे

मनोज भोसले

भाजप,रिपाई आठवले गट,रासप,रयत क्रांती व शिवसंग्राम महायूतीच्या वतीने चाळीसगाव येथे मा.तहसीलदार श्री.अमोलजी मोरे यांना निवेदन सादर करण्यात आले होते. दुध उत्पादकांना सरसकट १० रूपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो ५० रूपये अनुदान मिळणेबाबत राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता

गेंड्याची कातडी असलेल्या आणि झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य शासनाला दुध उत्पादक शेतकरी बांधवाच्या समस्या सोडवण्यास भाग पाडण्यासाठी १ ऑगस्ट २०२० रोजी महायूतीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन होणार आहे

आंदोलनाचे स्वरूप

1) सर्व दुधसंकलन (ग्रामीण व शहरी भागातील)केंद्रे बंद पाडणे
2)रास्ता रोको करणे, दुध टँकर अडवून ठेवणे
3)मा.तहसीलदार, मा.प्रांत सो.यांना दुध पिशव्या भेट देणे

विशेष उपस्थिती

खा.श्री. उन्मेषदादा पाटील
आ.श्री. मंगेशदादा चव्हाण

या आंदोलनात आजी माजी खासदार, आमदार, नगराध्यक्षा,सभापती, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी, महायूतीचे सर्व पदाधिकारी, गटप्रमुख, गणप्रमुख, आघाडी/मोर्चा पदाधिकारी,शक्तीकेंद्रप्रमुख, बूथप्रमूख ,कार्यकर्ते बंधू,दुध उत्पादक शेतकरी बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायूतीच्या वतीने करण्यात आले आहे.

चाळीसगाव येथे या आंदोलनात दुध उत्पादक शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन भाजपा तालूकाध्यक्ष प्रा.सूनील निकम,शहराध्यक्ष श्री.घृष्णेश्वर पाटील, रिपाई आठवले गटाचे जळगाव जिल्हाप्रमुख श्री. आनंद खरात,राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.विठ्ठलराव शिंगाडे,रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. श्री. अजय पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालूकाध्यक्ष श्री. रवींद्र पाटील, रिपाई आठवले गटाचे तालूकाध्यक्ष श्री. कैलास सूर्यवंशी, रयत क्रांती संघटनेचे शहराध्यक्ष श्री. पप्पूदादा पाटील यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button