झेप फाउंडेशन तसेच शिरीष दादा मित्र मंडळ तर्फे आठवडे बाजारपेठेचे आयोजन
अमळनेर (प्रतिनिधी) महिलांच्या सबलीकरणासाठी झेप फाउंडेशन तसेच शिरीष दादा मित्र मंडळ घेणार पुढाकार घेणार आहे. यासाठी येत्या २५ डिसेंबर रोजी आठवडे बाजारपेठेचे ओपनिंग करण्यात येणार आहे, आशी माहिती सोमवारी माजी आमदार शिरीष चौधरी यांचे स्टेशन रोडवरील इंदुमाई या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा रेखा चौधरी यांनी दिली. येत्या २५ डिसेंम्बर ला या बाजारपेठेचे ओपनिंग असून आम्ही यासाठी अमळनेर तालुक्यातील तसेच शहरातील महिला बचत गटांच्या सभासदांशी संपर्क साधला असून त्यांच्याशी याविषयी चर्चा देखिल केलेली आहे, अशी संकल्पना देशभरात पहिल्यांदा राबवली जाणार असून यातून बचत गटाच्या महिलांनी निर्मिती केलेल्या वस्तुंना विक्रीसाठी एका बाजारपेठेची निर्मिती होईल आणि भविष्यात फक्त अमळनेरला नाही तर मोठमोठ्या शहरात मॉल मध्ये देखील अमळनेरच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या वस्तू आपल्याला पहावयास मिळतील. असे देखील झेप फाउंडेशन च्या रेखा चौधरी यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी तसेच त्यांच्या धर्मपत्नी अनिता चौधरी यांनी देखिल आम्ही या विधायक कामात सर्वोतोपरी मदत करणार आहोत असे सांगितले.






