Lonand

लोणंद शहरातून पोलिस संचलन मोकाट फिरणारे , अनावश्यक गर्दी करणारांवर होणार कारवाई.

लोणंद शहरातून पोलिस संचलन

मोकाट फिरणारे , अनावश्यक गर्दी करणारांवर होणार कारवाई.

लोणंद प्रतिनिधी,दिलीप वाघमारे
दि०७

कोरोना मुळे संपूर्ण जिल्हात कर्फ्यू असल्याच्या पार्श्वभूमीवर लोणंद शहरातून संध्याकाळी मुख्य रस्त्यावरून पोलिस संचलन करण्यात आले.

लोणंद शहरात सध्या संचारबंदी लागू असल्याने सुरवाती पासूनच लोणंद पोलिसांनी कडक अंमलबजावणी केली आहे. आज संध्याकाळी त्याच अनुषंगाने शहरातून सुमारे वीस पोलिस कर्मचाऱ्यांसह पोलिस अधिकारी तसेच दोन वाहने होमगार्ड यांच्यासह लोणंद मधील मुख्य रस्त्यांवरून संचलन करण्यात आले. शहरात सद्य स्थितीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद आहेत. तसेच औषधे भाजीपाला किंवा किराणा खरेदीसाठी लोकांनी व व्यावसायिकांनी गर्दी होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. खरेदी दरम्यान योग्य अंतर ठेवावे अशी सुचना करण्यात आली आहे. तसेच मोकाट फिरणारांवर गाड्या जप्त करून पोलिस कारवाई यापुढेही चालूच राहणार असल्याचे तसेच अशा नियमभंग करणारांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी यांनी सांगितले. लोकांनी शासनाने सांगितलेले निर्देश पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button