Amalner

?️ ठोस प्रहार ग्राउंड रिपोर्ट… पहा अमळनेर कोव्हीड केअर सेंटर ची आजची स्थिती..काय म्हणाले डॉ गणेश पाटील…

?️ ठोस प्रहार ग्राउंड रिपोर्ट… पहा अमळनेर कोव्हीड केअर सेंटर ची आजची स्थिती..काय म्हणाले डॉ गणेश पाटील…

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना शहरात कोव्हीड केअर सेंटर ची निर्मिती करण्यात आली. या कोव्हीड केअर सेंटर मध्ये आज 50 रुग्ण कोरोना बाधित दाखल असून कोरोन्टाईन केलेल्या रुग्णांची संख्या 00 आहे.या सेंटर मध्ये 6 डॉक्टरर्स कार्यरत असून परिचारिका,फार्मसिस्ट आणि इतर कर्मचारी कार्यरत आहेत. सर्व कर्मचारी शिफ्ट प्रमाणे सातत्याने कार्यरत असून सर्वात जवळचा संपर्क कोरोना रुग्णांशी डॉ आणि परिचारिका यांचा आहे.2 वैद्यकीय अधिकारी, एक अधी परिचारिका आणि एक फार्मसिस्ट असा मुख्य स्टाफ असून जवळपास 18 परिचारिका कार्यरत आहेत.आज कोव्हीड मध्ये 50 कोरोना बाधित रुग्ण असून आता पर्यंत 106 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. आतापर्यंत 434 रुग्णांचे स्वॕब तपासणीसाठी पाठविले असून 82 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 352 अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती डॉ ताळे यांनी दिली आहे.

कोरोना रुग्णांची लाईन ऑफ ट्रीटमेंट अतिशय उत्कृष्ट असून 5 दिवस अँटी व्हायरल डोस दिल्यानंतर अँटी बायोटिक ट्रीटमेंट सुरू आहे.झामी चौक येथील कोरोना साखळी तोडण्यात डॉ यशस्वी झाले असून पीपीई किट घालून काम करणे अत्यन्त त्रासदायक असल्याचे डॉ नी सांगितले.

डॉ गणेश पाटील यांनी सांगितले की मल्टी व्हिटॅमिन,झिंक , व्हिटॅमिन c आणि लोह यांची शरीरात योग्य मात्रा असेल तर रोग प्रतिकारक शक्ती उत्तम राहते.तसेच आयुर्वेदिक औषधे ही नियमित घेतल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते.ते पुढे म्हणाले की कंठवटी, तुळशी,अश्वगन्ध,गूळवेल इ चा काढा नियमितपणे घेतल्यास आरोग्यासाठी उपाय कारक आहे.

या सर्व कर्मचाऱयांमध्ये सफाई कामगार, वॉटर सप्लाय करणारे भानुदास प्रदोष चौधरी, सुभाष सोनवणे इ चा देखील मोलाचा वाटा आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button