Mumbai

राष्ट्रगीताने विधानपरिषद व विधानसभेचे कामकाज संस्थगित; पुढील अधिवेशन २४ फेब्रुवारी रोजी

राष्ट्रगीताने विधानपरिषद व विधानसभेचे कामकाज संस्थगित; पुढील अधिवेशन २४ फेब्रुवारी रोजी

एस एम पोरे

मुंबई, दि. 21 : राष्ट्रगीताने हिवाळी अधिवेशन संस्थगित करण्यात आले. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी तर विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

विधानपरिषदेचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित

विधानपरिषदेचे हिवाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. आगामी अधिवेशन मुंबई येथे 24 फेब्रुवारी 2020 रोजी सुरू होणार आहे, अशी घोषणा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
श्री. निंबाळकर म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत एकूण सहा बैठका झाल्या. प्रत्यक्षात 34 तास 39 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी 5 तास 50 मिनिटे कामकाज झाले. विधानपरिषदेत नियम 93 अन्वये 27 सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 15 निवेदने स्विकृत झाल्या. सभागृहात सात सूचनांवर निवेदने झाली तर तीन निवेदने सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली.
विधानपरिषदेत 59 औचित्याचे मुद्दे प्राप्त झाले असून 45 मुद्दे मांडण्यात आले. तसेच 509 लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 139 सूचना मान्य झाल्या तर 30 सूचनांवर चर्चा झाली. विशेष उल्लेख अंतर्गत 113 सूचना प्राप्त झाल्या तर 78 सूचना मांडण्यात आल्या. अशासकीय विधेयकावर 2 सूचना प्राप्त झाल्या व त्या दोन्ही स्वीकृत करण्यात आल्या. नियम 289 अन्वये 13 प्रस्ताव प्राप्त झाल्या होत्या, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button