Amalner

अतिवृष्टीने अमळनेर ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा तोंडचा घास पळविला

अतिवृष्टीने अमळनेर ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा तोंडचा घास पळविला..शेतकरी राजा झाला हवालदिल..

विनोद जाधव

अमळनेर:तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे तालुक्यातील ऐन बहरीनला आलेल रामेश्वर परीसरातील पिके अतिवष्टीमुळे नष्ट झाली आहेत.तोंडाशी आलेला खास हीरावला गेल्याने परीसरातील शेतकरी हीरमुसला झाला आहे.अतिवृष्टीने अमळनेर ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा तोंडचा घास पळविलाअमळनेर तालुक्यातील रामेश्वर खुर्द परीसरातील रामेश्वर बु।।,पळासदळे.खेडी बु,ढेकु परीसरात अतिवष्टी झाली.यात या परीसरातील बहरलेली पिके ज्वारी,मका,कापूस व भुईमूग या पिकांचे मोठया प्रमाणात नूकसान झाले आहे.या परीसरातील शेतकरी हवालदील झाले आहेत.याचा परीणाम अर्थव्यवस्थेवर पडू शकतो.आधीच कोरोना संसर्गामुळे जन सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. हात मजुरी करणाऱ्या लोकांवर उपास मारीची वेळ आली आहे. अश्या परिस्थितीत शहरातील अनेक कंपन्या बंद पडल्या मुळे हजारो मजूर नोकरदार वर्ग गावाकडे परतला आहे .आणि गावकडील थोडी फार शेती करून उदरनिर्वाह करता येईल या आशेवर गावाकडे परतला आहे.आता परतीच्या पावसाने मात्र हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button