कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातील जनावरांचा आठवडा बाजार नामशेष होण्याच्या मार्गावर
दिलीप वाघमारे
लोणंद शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातील जनावरांचा आठवडा बाजार नामशेष होण्याच्या मार्गावर पूर्वीच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यातील फार मोठा बाजार म्हणून त्याची गणना होती त्याच आठवडा बाजार ची आठवण आणि आजची परिस्थिती बघता जनावर नामशेष झाली. दलाल लोक उपासमार होऊ लागली आठवडा बाजारात जनावर दिसेनाशी झाली आगामी काळात बंद होण्याच्या मार्गावर परिस्थिती निर्माण झाली आहे आज खेडोपाडी पासून शहरापर्यंत दूध डेरी मोठ्या निर्माण होऊ लागल्या परंतु जनावरं नामशेष याकडे शासनाने दुर्लक्ष करून चालणार नाही आणि जिल्हा परिषदेच्या कृषी खात्यामार्फत प्रत्येक वर्षी जनावरं शेतकऱ्यांना दिली जातात त्यांना अनुदान दिले जाते नेमकं शेतकऱ्यांच्या बांधावर ती गोठ्यामध्ये जनावर का नाहीत याचा सर्वे करणे जरुरी आहे आगामी काळात शहराकडे जाणारे दूध कसे निर्माण होणार याचाही शासनाने सर्वे करावा शेळ्यामेंढ्या गाईगुरे बैल रेड यामुळे बाजाराची लोणंद करांची ओळख महाराष्ट्रात पोहोचली होती परंतु मार्केट कमिटी मधील आठवडा बाजार नामशेष होत चालल्याची अशी परिस्थिती आज रोजी पाहायला मिळत आहे काही दिवसाने जनावरे नाहीत तर शेतीला खत मिळणार नाही आज प्रत्येकाच्या घरासमोर ट्रॅक्टर सारखी वाहन आली काही कुटुंब समृद्धी झाली परंतु गाय वासरे आजच्या काळात लोप पावत चालले आहेत तरी आगामी काळामध्ये शासनाने जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक शेतकऱ्याला जनावरे देऊन जोपासना करणे काळाची गरज आहे






