Dhule

शिवसेनेतर्फे “माझे कुटुंब, माझी जवाबदारी” जनजागृती फेररी

शिवसेनेतर्फे “माझे कुटुंब, माझी जवाबदारी” जनजागृती फेरी

असद खाटीक

माझे कुटुंब, माझी जवाबदारी” जनजागृती फेरी आज संपन्न झाली. माहिती पत्रके वाटून नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले. धुळे जिल्ह्यात घरा-घरात ही माहिती पत्रके पोहचवली जाणार आहे. जनजागृती फेरीप्रसंगी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल आण्णा माळी, युवासेना महाराष्ट्र सहसचिव तथा धुळे जिल्हाप्रमुख ऍड.पंकज गोरे, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील, महानगरप्रमुख प्रफुल दादा पाटील, उपजिल्हाप्रमुख किरण तात्या जोंधळे, उपमहानगरप्रमुख जवाहर आण्णा पाटील, संदीप सूर्यवंशी, पुरुषोत्तम जाधव, मंच्छिद्र निकम, संदीप चव्हाण, बबलू माळी, युवासेना संदीप मुळीक, प्रेम सोनार,भूषण पाटील, विष्णू प्रजापत, तसेच शिवसेना – युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
धुळे जिल्ह्यात ही माहिती पत्रके घरा-घरात पोहचवली जाणार असून धुळे शहरातील प्रत्येक विभागात ही माहिती पत्रके वाटप करून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” अभियान यशस्वीपणे राबवून नागरीकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी 1 लाख पत्रके वाटण्याचा संकल्प शिवसेनेचा आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button