India

आरोग्याचा मुलमंत्र…कडू कारल्याचे गोड फायदे

आरोग्याचा मुलमंत्र…कडू कारल्याचे गोड फायदे

कारले म्हटल्यावर अनेकजण नाकं मुरडतात. पण या कडू कारल्याचे फायदे ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. पहा काय आहेत फायदे…

१) लिंबाच्या रसाबरोबर कारल्याचे रसाला चेहऱ्यावर लावल्याने मुरूम बरे होतात, आणि त्वचेचे आजार होत नाही.

२) कर्करोगाशी लढण्यासाठी कारल्याच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

३) पोटात गॅस बनत असल्यास आणि अपचनामध्ये कारल्याच्या रस घेणे चांगलेच असते, जेणे करून आपल्यापासून हे आजार लांबच राहतं.

४) कारल्याचा रस प्यायल्याने आपले यकृत बळकट होतच, त्याचबरोबर यकृताचे सर्व त्रास बरे होतात. दररोज नियमाने हे घेतल्यास एका आठवड्यात चांगले परिणाम दिसून येतात. कावीळ मध्ये देखील हे फायदेशीर आहे.

५) कारल्याची पाने किंवा फळाला पाण्यात उकळवून प्यायल्याने, रोग प्रतिकारक शक्ती वाढते, आणि कुठल्याही प्रकाराचे संसर्ग झाल्यास बरे होतात.

६) उलट्या, जुलाब, किंवा कॉलरा झाला असल्यास कारल्याचा रसात काळंमीठ टाकून प्यायलास लगेच आराम मिळतो. जलोदर झाला असल्यास देखील दोन चमचे कारल्याचा रस पाण्यामध्ये टाकून प्यायल्याने फायदा होतो.

७) अर्धांगवायूचा त्रास झाला असेल तरी ही कारलं खाणे खूप प्रभावी उपाय आहे. त्यात कच्च कारलं रुग्णासाठी फायदेशीर आहे.

८) रक्त स्वच्छ करण्यासाठी देखील कारलं अमृता सारखे आहेत. मधुमेहाचा आजारांसाठी देखील हे प्रभावी मानले आहे. मधुमेह असल्यास एक चतुर्थांश कप कारल्याचे रस, तेवढ्याच प्रमाणात गाजराचा रस पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथिक तज्ञ )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button