Amalner

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग..अमळनेर येथे 60 व्या महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडा फडकलाच नाही..

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग..६० व्या महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडा फडकलाच नाहीप्रा जयश्री दाभाडेअमळनेर येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.परिणामी सध्या संपूर्ण तालुक्यात लॉक डावून सुरू आहे. सर्वच क्षेत्रांवर या लॉक डाऊन चा मोठा परिणाम झाला आहे.आज एक मे महाराष्ट्र आणि कामगार दिवस… १ मे हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.१ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. या दिवसा पासून ते आजतागायत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि इतर ठिकाणी झेंडावंदन करून महाराष्ट्रातील शुर विरां मानवंदना दिली जाते.?️ ठोस प्रहार ब्रेकिंग..अमळनेर येथे 60 व्या महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडा फडकलाच नाही..कोरोनाने आज तेही करून दाखवल जे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच यापूर्वी घडल नाही.आज अमळनेर उपविभागीय कार्यालय येथे सकाळी 60 व्या महाराष्ट्र् दिना निमित्त झेंडा फडकलाच नाही. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या आदेशानुसार जिल्हा पातळीवर च झेंडावंदन साध्या पद्धतीने करण्याचे महाराष्ट्र शासनाने आदेश दिले होते. त्यामुळे आज मात्र सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालये सूनी वाटत होती.या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. परंतु आज मात्र कोरोना हा उत्सव साजरा करता आला नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button