?️ अमळनेर कट्टा… रासी सीडस कंपनी तर्फे मका-3499 खरेदीवर सायकल गिफ्ट…
अमळनेर : रासी सिड्स या बियाणे उत्पादन व विक्रीमध्ये अग्रगण्य असणाऱ्या कंपनीने रासी मका-3499 या नवीन वाणाच्या विक्रीतून जेनचेक या योजनेद्वारे काल अमळनेर तालुक्यातील बिलखेडा गावातील शेतकरी श्री रवींद्र भगवान पाटील या शेतकऱ्यास रासी कंपनी चे अधिकृत विक्रेते कृषिविकास ऍग्रो एजन्सी अमळनेर यांचे तर्फे लकी ड्रॉ पद्धतीने सायकल भेट देऊ केली
कंपनीने मागील वर्षापासून बाजारात आणलेल्या रासी मका-3499 या वाणाचे मागील वर्षीच्या रब्बी व खरीप हंगामातील शेतकऱ्यांना आलेले भरघोस उत्पादन पाहता यंदा शेतकरी वर्गातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे
या बक्षीस वितरण सोहळ्यात रासी कंपनीचे अधिकृत विक्रेते श्री योगेश पवार व चेतन पाटील तसेच कंपनी चे जिल्हा प्रतिनिधी अमोल बोरसे , प्रतीक पाटील व गौरव पवार उपस्थित होते
तरी शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामामध्ये रासी मका-3499 वाणाची जास्तीत जास्त लागवड करून जेनचेक योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान विक्रेता व प्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आले…






