MaharashtraMumbai

एप्रिल फूल’ची अफवा पसरवल्यास कारवाई : गृहमंत्री अनिल देशमुख

एप्रिल फूल’ची अफवा पसरवल्यास कारवाई : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई पी व्ही आनंद

एप्रिल फूल नावाखाली चेष्टा करू नये. विनाकारण देशात संचारबंदी असताना चेष्टाचा विषय केला जाता कामा नये असं आवाहन गृहमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे. एप्रिल फूल नावाखाली कोणी चेष्टा केली त्यासंबधी कोणी पोलिसाकडे तक्रार केली तर पोलीस योग्य ती दखल घेतील, पण लोकांनी ही चेष्टेचा विषय करू नका परिस्थितीच गांभीर्य ओळखा असं आवाहान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे._

_एक एप्रिल निमित्त नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज एप्रिल फुल बनवण्याकरता टाकले जाऊ शकतात, यात जमाव बंदी उठली आहे,सर्व लोक रस्त्यावर एकत्र यावे अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर येण्याची शक्यता आहे.अशा एप्रिल फूल साठी सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजवर कोणीही बळी पडू नये अन्यथा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

देश आणि राज्यावर कोरोना व्हायरसचे संकट आहे. लोकांना कोणीही घाबरविण्याचा किंवा त्यांची फसवणूक करु नका.विनाकारण प्रशासन,पोलीस यंत्रणा आणि लोकांवर ताण येऊ शकतो.त्यामुळे १ एप्रिलला ‘एप्रिल फूल’ न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button