Parola

? पारोळा चोरवड रस्त्यावर एकाचा घातपात संशयित ट्रक पोलिसांच्या ताब्यात

? पारोळा चोरवड रस्त्यावर एकाचा घातपात संशयित ट्रक पोलिसांच्या ताब्यात
पारोळा : पारोळा चोरवड रस्त्यावर वाघरे गावालगत एका अज्ञात व्यक्ती मृत अवस्थेत पडल्याची माहिती पारोळा पोलिसांना दि २६ रोजी सकाळी मिळाली होती. त्यानुसार तपास सुरू असताना सुळ बाभूळ भरलेला ट्रक क्रमांक जी. जे. २६ टी ३६३८ ने रात्री ११ वाजेच्या सुमारास जीवनधारा कोव्हिड सेंटरच्या गेटला धडक दिल्याची माहिती मिळाली होती. सदर ट्रक च्या धडकेत कोव्हिड सेंटर चे नुकसान झाले होते. ती भरपाई मिळावी म्हणून ट्रक चालकास कोव्हिड सेंटर च्या टीम ने ताब्यात घेऊन ट्रक देखील तिथेच थांबवून ठेवला होता. यावेळी घातपात झालेला व्यक्ती हा ट्रक चा संबधीत आहे. हे कोव्हिडं सेंटर च्या पथकास माहिती न झाल्याने त्यांनी रात्री या घटने बाबत पोलिसांना माहिती दिली नाही.या बाबत दि २६ रोजी पोलीस निरिक्षक संतोष भंडारे , सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल , यांनी घटनास्थळी भेट देऊन मयत व्यक्तीचे शव पारोळा कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन साठी आणले होते. वैद्यकीय तपासणीत मयताच्या डोक्यावर , पायावर व इतर अनेक भागावर जोरदार प्रहार केलेले दिसून येत होते. रक्तबंबाळ स्थितीत असलेले शव पाहता हा नक्की घातपात असल्याचा संशय पोलिसांनी डोळ्यासमोर ठेवत चौकशी सुरू केली.
प्रथम जीवन धारा कोव्हिडं सेंटर चे डॉक्टर व कर्मचारी यांना ताब्यात घेतले होते. उशिरा पर्यन्त त्यांची अतिरिक्त पो अधीक्षक चाळीसगाव सचिन गोरे , उपविभागीय अधिकारी राकेश जाधव पो. नि. संतोष भंडारे यांच्या कडून चौकशी सुरू होती.यावेळी फॉरेन्सिक लॅबच्या पथकास पाचारण करण्यात आले होते.तर सर्व डाँ कर्मचारी यांचे मोबाईल तपासणी साठी पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.तर ट्रक मध्ये जयेश वसंत मालचे धनोटा शहादा हा मयतासोबत असल्याचे समजते.
वाघरे रस्त्यावर दि २६ रोजी सकाळी ८.३० वाजता सार्वजनिक जागेवर एका ३५ ते ४० वर्ष वयाचा सिध्या कर्मा भिल रा कारागड काटेपाडा ता नवापूर जिल्हा नंदुरबार हा रक्तबंबाळ स्थितीत असलेले पडल्याची खबर वाघरे पोलीस पाटील भाऊसाहेब आत्माराम हटकर यांनी पारोळा पोलिसात दिल्यावरून अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून या बाबत पुढील तपास हवालदार सुनील वानखेडे करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button