अमळनेर तालुक्यातील पाहिले कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टर झाले कोरोना मुक्त…
रजनीकांत पाटील
अमळनेर : शिरूड येथील रहिवासी खाजगी प्रॅक्टिस करणारे डॉकटर हे नुकतेच कोविड सेंटर जळगांव येथून कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहे. कोरोनाची लागण झालेले ते अमळनेरातील पहिले डॉक्टर आहेत.आज सायंकाळी ते जळगांव येथून सुखरूप बरे होऊन आर के नगर येथिल घरी परतले.त्यांचे परिसरातील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, खा शि मंडळाचे मा अध्यक्ष महेश देशमुख , शरद मधुकर पाटिल,विजय पाटील,श्रीकांत पाटिल,आर एस पाटिल,प्रल्हाद पाटिल,आदिंसह रहिवाश्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
यावेळी डॉक्टर यांनी संकटकाळी आपल्याला व कुटुंबाला धीर देत आधार देणाऱ्या कॉलनीवासीयांनी आभार मानले तर अमळनेर व जळगांव येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे ऋण यावेळी नगरवासियांशी बोलतांना व्यक्त केले.






