Amalner

राष्ट्रीय मानवधिकार संगठन च्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पाटील चिलाणेकर तर उपाध्यक्षपदी ईश्वर महाजन संघटक भिकन पाटील यांची नियुक्ती

राष्ट्रीय मानवधिकार संगठन च्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पाटील चिलाणेकर तर उपाध्यक्षपदी ईश्वर महाजन संघटक भिकन पाटील यांची नियुक्ती

जळगाव ( जि प्र ) राष्ट्रीय मानवधिकार एवं सामाजिक व न्याय संगठन संस्थेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पाटील चिलाणेकर ( एरंडोल ) उपाध्यक्षपदी ईश्वर महाजन ( अमळनेर ) तर जिल्हा संघटक पदी भिकन पाटील ( पाचोरा ) यांची नियुक्ती करण्यात आली उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुभाष भोई व राज्याचे उपाध्यक्ष गोपालजी मारवाडी यांनी नियुक्तीचे पत्र दिले संस्थेचे सामाजिक कार्य अन्याया विरोधात लढा अत्याचार विरोधात लढा सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जनाहित आदोलन गरीब जनतेवरचा अन्याय दुर करणे न्यायाची बाजू मांडणे मानवावर आर्थीक भार अन्यायकारक करत असतील तर ते बंद करणे अशा विविध जनतेच्या न्याय हक्कासाठी संस्थेचे कार्य असून नवनियुक्त पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर उपाध्यक्ष ईश्वर महाजन संघटक भिकन पाटील यांनी जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहू समाजात अन्याय अत्याचार विरोधात आम्ही कार्य करू वाईट प्रवृत्तीच्या प्रवाहाला अडा घालू सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू संस्थेच्या माध्यमातुन विविध विधायक सामाजिक सांस्कृतीक उपक्रम राबवू व संस्थेमार्फत योग्य न्याय मिळवून देण्याचे कार्य सुरू ठेऊ नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडीबदल राष्ट्रीय अध्यक्ष दिवाकरजी श्रीवास्तव महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कृष्णाजी पांडे प्रदेश सचिव प्रविण जुमळे सयुक्त सचिव विनोद राठोड यशवंत निकवाडे आदिंनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button