सिडको एन 3 येथे वृद्धाच्या पार्थिवास कन्या व सूनेने दिला मुखाग्नी
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सिडको एन-३ येथील व्यावसायिक ओमप्रकाश खन्ना (वय 88) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांनी डोळे मिटण्यापूर्वीच एका तासापूर्वीच मुलगा व नातवांवर काळाने घाला घातला. त्या दोघांना खांदा द्यावा लागलेल्या खन्ना यांच्या पार्थिवास सून व कन्येने अग्नीडाग दिला. व्यावसायिक खन्ना यांचा मुलगा प्रेमप्रकाश व नातू जेनेश याचे अकाली निधन झाले. या दोघांच्याही पार्थिवावर खन्ना यांना अंत्यसंस्कार करावे लागले.
मुलगा गेल्यानंतर त्यांनी सुनेलाच मुलगा मानले. एवढेच नव्हे तर ते तिला मुलाच्या नावानेच हाक मारत. त्यांच्या पार्थिवावर कोण अंत्यसंस्कार करणार असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला. तेव्हा, मुलगी सीमा मेहरा व सून नीलम खन्ना दोघी समोर आल्या. त्यांनी सिडको एन ६ येथील स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.






