Mumbai

अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; आर्थर रोड तुरुंगात होणार रवानगी..?

अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; आर्थर रोड तुरुंगात होणार रवानगी..?

मुंबई माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना 19 नोव्हेंबरपर्यंत तुरुंगात राहावं लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

अनिल देशमुख यांची ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना आज पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते.दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला त्यानंतर न्यायालयाने 19 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.त्यामुळे आता अनिल देशमुख तुरुंगात राहणार आहेत.

दरम्यान देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांचे वकील आज किंवा उद्या जामिनासाठी अर्ज करतील.देशमुख यांना जामीन मिळण्यासाठी त्यांच्या आरोग्याचं कारण आणि सर्वोच्च न्यायालयात ईडीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा हवालाही दिला जाण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?
अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर वसुलीचे आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारकडून माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button