संगनमताने खोटे खरेदी खत केल्याप्रकरणी एरंडोल न्यायालयाच्या आदेशावरून पो.स्टे.ला गुन्हा दाखल
विक्की खोकरे
एरंडोल:तालुक्यातील उञाण येथे आरोपींनी संगनमताने खोटे खरेदी खत करून फसवणूक केल्या प्रकरणी एरंडोल न्यायालयाच्या आदेशावरून येथील पोलीस स्टेशन ला दि. ३मार्च. रोजी राञी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी गणेशकुमार सुंदरलाल उर्फ रामसुंदर जैस्वाल रा.वंगणी ता.अंबरनाथ हे असुन आरोपींमध्ये१) जवाहरलाल शंकरलाल जैस्वाल(रा.उञाण)२)सुभाष शंकरलाल जैस्वाल(रा.वरळी नाका मुंबई)३)मायाबाई सुभाष जैस्वाल(रा.वरळी नाका मुंबई )४) सुरेखा सुरेश जैस्वाल(रा.न्यायडोंगरी)५)गोकुळ काशिनाथ जैस्वाल(मयत)६)सतीश विश्वनाथ जैस्वाल व वसंत रामदास महाजन रा. उञाण यांचा समावेश आहे.






