महालगाव येथील बजाज शोरुम मध्ये चोरी
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : विरगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, दरोडे यांचे सत्र सुरूच असून मागील काही दिवसांपूर्वी गावातील झालेल्या तीन दुकानात साडी, मोबाईल, तसेच पट्रोल पंपावर दगडफेक असे विविध प्रकारच्या चोर्या व शनि देवगांव येथील दरोड्याचा तपास अजूनही गुलदस्त्यात आहे.
तालुक्यातील महालगांव येथिल बजाज शोरुमचे अज्ञात चोरांनी मागील शटर फोडुन दोन मोटार सायकलची चोरी केल्याची घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी कि तालुक्यातील महालगांव येथील बजाज शोरुमचे मागील शटर तोडून दोन नविन मोटारसायकल पल्सर 125 व 150 cc ची अडीच लाख रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकलची चोरी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज मिळु नये यासाठी हार्डीक्स ही घेवुन गेले. तसेच शोरूममध्ये कपाटाची उचका पाचक करुन पांगापांग झाल्याची घटना गुरुवार दिनांक २२ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच विरगांव पोलीस ठाण्याचे फौजदार कदम साहेब अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन याबाबत पंचनामा व चौकशी सुरू आहेत.






