?️ अमळनेर कट्टा…आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी तर्फे अतिरिक्त का. अभियंता सो महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला सक्तीची वीज बिल वसुली महिमेत सवलत द्यावी याकरिता निवेदन
अमळनेर : येथील आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी तर्फे अतिरिक्त का. अभियंता सो महाराष्ट्र वीज वितरण कंपनी ला सक्ती ची वीज बिल वसुली महिमेत सवलत द्यावी याकरिता आज दि.30/06/2021 रोजी निवेदन देण्यात आले.
कोविड 19 मुळे ओढवलेल्या बिकट परिस्थिती मुळे नागरिकांना गेल्या 4महिन्यापासून नियमित वीज बिल देयके मिळाले नाहीत.आपल्या कार्यलया तर्फे नागरिकांना आता गेल्या 3/4महिन्याचे वीज बिल एकत्रित देण्यात आलेले आहेत.त्यामुळे सदरहू बिल ची रक्कम फार मोठ्या प्रमाणात असल्यांमुळे व कोविड चा लोकडाऊन मुळें नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असल्यामुळे सदरहू बिल एक रकमी भरणे नागरिकांना शक्य होऊ शकत नाही.अश्या परिस्थिती त सक्तीची वीज बिल वसुली मोहीम राबवून नागरिकांचे वीज कनेक्शन कट करणे हे अतिशय अन्याय कारक आहे.तरी नागरिकांना वीज बिल अदा करण्यात विशेष सवलत देऊन (3/4टप्प्यात) हवालदिल झालेल्या नागरिकांना दिलासा द्यावा.अन्यथा आम्हास आंदोलनाची भूमिका स्वीकारावी लागेल.अश्या अशयाचे निवेदन आज दि 30 रोजी आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी तर्फे निवेदन देण्यात आले.निवेदनावर गटनेते प्रविणकुमार पाठक, प्रतोद सलिम भाई टोपी,उपगटनेते सौ. सविता संदानशिव,देविदास महाजन नगरसेवक ,अनिल गंगाराम महाजन,पंकज पंडित चौधरी,महेश राजू जाधव,धनंजय रमेश महाजन,योगराज राजेश संदानशिव,किरण देविदास बागुल,संतोष लोहेरे,हरिष देशपांडे, राघव देशपांडे,परागभाऊ चौधरी आदींचा स्वाक्षरी आहेत.






