Amalner

पालघर गडचिंचले येथिल घटनेचा अमळनेर भाजप कडून निषेध

पालघर गडचिंचले येथिल घटनेचा अमळनेर भाजप कडून निषेध

आमदार स्मिता वाघ, महामंडलेश्वर श्रीहंसराजजी महाराज यांचे प्रांताधिकारी याना निवेदन “

अमळनेर नूरखान

पालघर तालुक्यातील गडचिंचले येथील साधू संतावर हल्ला करून त्यांची हत्या करणाऱ्या जमावावर आणि दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी, विधान परिषद सदस्या, आमदार स्मिताताई वाघ, निम कपीलेश्वर येथील महामंडलेश्वर श्रीहंसराजजी महाराज आणि अमळनेर भाजप यांनी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे केली
सोमवारी आमदार वाघ आणि महामंडलेश्वर यांनी प्रांताधिकारी अहिरे यांची भेट घेऊन याघटनेचा निषेध व्यक्त करता निवेदन दिले

निवेदनात म्हटले आहे की,
पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे गडचिंचले गावात, संचार बंदी असताना सुमारे 200 पेक्षा अधिक नागरिकांचा जमाव जमवून, शासकीय परवानगी घेऊन प्रवास करणाऱ्या हिंदू साधू संत कल्पवृक्ष गिरी, सुशील गिरी, व चालक निलेश तेलगडे यांची काठी व दगडाच्या मारा करून निर्घृण हत्या करण्यात आली, या घटनेच्या वेळी उपस्थित असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जमावाला अटकाव करण्याचा काहीही प्रयत्न केला नाही त्याविरुद्ध देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील,शहर अध्यक्ष उमेश वाल्हे, सरचिटणीस राकेश पाटील, बबलु राजपूत, चंद्रकांत कंखरे व राहुल चौधरी आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button