Amalner

Amalner: गरुडझेप: चि प्रसन्न चौधरीचे पूर्व माध्य शिष्यवृत्ती परीक्षेत यश… जिल्ह्यात प्रथम तर राज्यात 20 व्या स्थानावर…

Amalner: गरुडझेप: चि प्रसन्न चौधरीचे पूर्व माध्य शिष्यवृत्ती परीक्षेत यश… जिल्ह्यात प्रथम तर राज्यात 20 व्या स्थानावर…

अमळनेर लक्ष्मीनगर येथिल चि. प्रसन्न हिंमत चौधरी हा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा(PSS) २०२३ मध्ये ग्रामिण विभागातून महाराष्ट्र राज्य गुणवत्ता या यादीत २० वा आला, तो जळगाव जिल्हातून प्रथम आला आहे. विशेष म्हणजे तो राज्याच्या गुणवत्ता यादीत जिल्ह्यातून एकमेव आहे.

तो इ.८ वी नवोदय प्रवेश परिक्षेत सुद्धा उत्तीर्ण होऊन त्याची इयत्ता ९वी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली आहे .
तो सेंटमेरी इंग्लीश मिडीयम स्कूल मंगरूळ ता. अमळनेर या शाळेचा विद्यार्थी आहे .
त्याला या यशासाठी शाळेच्या प्राचार्या व शिक्षवृद तसेच श्री. मोराणकरसर व ज्ञानदिप क्लासेसचे संचालक श्री. ज्ञानेश्वर सांळुखेसर, आई, वडिल व दिदी डॉ.सिद्धि चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तो श्री. हिंमत ओंकार चौधरी (मुख्याध्यापक,जि.प. उच्च प्राध. शाळा खवशी) व सौ. निलम हिंमत चौधरी (सहशिक्षिका प्रा.शा.मंगरूळ) यांचा मुलगा आहे.
त्याच्या या यशाबद्दल मा.आ.दादासाहेब .श्री. शिरीष चौधरी, मा.प्रा.डॉ. सुभाप महाजन सर व कर्तव्य बहुउदेशीय संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब श्री.सुनिल चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. पी.डी. धनगर साहेब व केंद्रप्रमुख श्री. चंद्रकांत साळुके साहेब, राज्यपुस्कार प्राप्त आदर्शशिक्षक श्री. सदानंद भावसार सर व विविध मान्यवर व आप्तेष्ठ, प्राचार्या, शिक्षकवृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्याच्या पुढील शैक्षणिक प्रगतिसाठी शुभेच्छा ….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button