Chimur

विवाहित तरुणाचा अपघातात म्रुत्यु

विवाहित तरुणाचा अपघातात म्रुत्यु

चिमुर ၊- चीमुर तालुक्यातील येथून जवळच असलेल्या बोथली ते काजळसर रस्त्यावर रामकृष्ण खोब्रागडे यांच्या शेतात पळसाच्या झाडाजवळ वळणावर दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघातात त्याचा जागीच म्रुत्यु झाल्याची घटना उघडकीस आली
गोकुल शिवराम चौधरी रा.पेंढरी (को) वय ४५ वर्षे असे म्रुतकाचे नाव आहे हा बोथली येथे नातेवाईकांच्या येथे तेरवी आला होता काल दि.२९ नोव्हेंबर ला तेरवी कार्यक्रम आटोपून सायंकाळच्या सुमारास गावाकडे आपल्या हिरो होंडा स्लेंडर प्लस दुचाकी क्रमांक m.h.31-bo-6932 ने निघाला
असता अडेगाव फाट्याचे समोर रामकृष्ण खोब्रागडे यांच्या शेताजवळील वळणावर दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने सरळ पळसाचे झाड व रस्त्याचे दगडाला धडक मारुन रस्त्याचे बाजूला पडला
व या दुर्दैवी अपघातात त्याचा जागीच म्रुत्यु झाला सदर घटना ही रात्री ची असल्याने तसेच रस्त्यावरील भुतगांज्याचे वनस्पती असल्याने ही बाब रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांंच्या निदर्शनास आली नाही व मदत मिळु शकली नाही सदर बाब ही आज दि.३० नोव्हेंबरला उजेडात आली.
व्रुत्त लिहीस्तोवर पोलीस घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आले होते. म्रुतकाचे मागे पत्नी व बराच मोठा आप्त परिवार आहे म्रुत्यु मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button