Rawer

News Empact:ठोस प्रहारचा दणका: बातमी नंतर दोन दिवसांत निंभोरा रस्त्यावरील सार्वजनिक खांबावरील दिवे सुरू…

ठोस प्रहारचा दणका: बातमी नंतर दोन दिवसांत निंभोरा रस्त्यावरील सार्वजनिक खांबावरील दिवे सुरू…

ठोसप्रहार इंम्पॅक्ट

रावेर प्रतिनिधी/ मुबारक तडवी
विद्युत महावितरणच्या अथक परिश्रमातून
ग्रामपंचायतीने दखल घेत
विद्युत खांबावरील पथदिवे दोन दिवसांच्या प्रतिक्षा काळोखानंतर स्ट्रीट लाईटचे प्रकाश आज झळकले मात्र लोंबकळत असलेल्या विद्युत वाहक जीर्ण वीज तारांंचा प्रश्न जैसे चा तैसेच आहे नागरिकांचा जीवघेणा प्रवास या लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिनीच्या वीज तारांखालूनच सुरू आहे

मोठा वाघोदा.ता.रावेर. मोठा वाघोदा येथील निंभोरा रस्त्यावरील आदिवासी दलीत मुस्लिम वस्त्यां मथील विद्युत खांबावरील( स्ट्रीट लाईट)) भरपावसात दोन दिवसांपासून बंदच होती ठोस प्रहार ने वृत्त प्रकाशित करताच विद्युत मंडळाच्या डोळ्यावरची पट्टी सरकली आणि महावितरणच्या अधिकारी कर्मचारी यांनी सकाळपासून अथक परिश्रम घेत मोठा वाघोदा येथील निंभोरा रस्त्यावरील आंबेडकर नगर दलितवस्ती मुस्लिम वाडा तडवी वाडा सह नाल्या काठ परिसरातील सार्वजनिक विद्युत खांबावरील पथदिवे सुरू केले त्याबद्दल निंभोरा रस्त्यावरील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले तसेच निंभोरा रस्त्यावरील लोंबकळत असलेल्या जीवघेणा विद्युत तारांची समस्या तात्काळ सोडवावी कारण याच रस्त्यावर लोंबकळत असलेल्या वीज वाहक जीर्ण तारांमुळे मोठा वाघोदा येथे काही वर्षांपूर्वी लोंबकळत असलेल्या विद्युत तारांचा केळी घड भरायला शेतात जात असतांना विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरील लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिनीच्या वीज तारांचा केळीचा ट्रक ला स्पर्श होऊन केळी वाहतूक करणाऱ्या ४ केळी कामगारांचा जीव या विद्युत वाहिनीच्या वीज तारांंनी घेतला होता त्यावेळी मोठा वाघोदा येथील *व बर्निग ट्रक* ही घटना महाराष्ट्र भर गाजली होती लोंबकळणार्या विद्युत तारांनी गरीब मजुरांचे प्राण घेतले होते तीच परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची दाट शक्यता आता सुद्धा जैसे थे आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button