Amalner

बोरी मध्यम प्रकल्प ( तामसवाडी ) ता.पारोळा जि.जळगांव या प्रकल्पातील राखीव पाणी साठयातून पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षण मिळावे .. नगराध्यक्षा पुष्पलता पाटील

बोरी मध्यम प्रकल्प ( तामसवाडी ) ता.पारोळा जि.जळगांव या प्रकल्पातील राखीव पाणी साठयातून पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षण मिळावे .. नगराध्यक्षा पुष्पलता पाटील

प्रा जयश्री दाभाडे

बोरी मध्यम प्रकल्प ( तामसवाडी ) ता.पारोळा जि.जळगांव या प्रकल्पातील राखीव पाणी साठयातून पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षण मिळावे .. नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी पत्राद्वारे मा.ना.श्री.गुलाबराव पाटील, मा.जिल्हाधिकारी मंत्री – पाणीपुरवठा स्वच्छता तथा जळगांव पालकमंत्री जळगांव जिल्हा तसेच मा.कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग,जळगाव यांच्या कडे केली आहे.

विषयांकीत बोरी मध्यम प्रकल्प ( तामसवाडी ) ता.पारोळा या प्रकल्पाचा एकूण
जलसाठा 40.31 दलघमी असून प्रकल्पाच्या साचलेल्या गाळाच्या सर्व्हेक्षणानुसार 5.22 दलघमी एवढी बोरी प्रकल्पाची जल क्षमता गाळ साचल्यामुळे कमी झालेला आहे. अमळनेर शहरासह, पारोळा, बहादरपूर, महाळपूर शिरसोदेसह बोरी नदीकाठावरील गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी प्रकल्पातून
136 दलघफु पाणी उचल करण्यासाठी जलनियोजनात तरतूद आहे. सुदैवाने यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे बोरी प्रकल्पाचा जलसाठा पुर्ण क्षमतेने भरलेला आहे. सद्दस्थितीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सटलेला आहे. तथापि भविष्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यास आवश्यक उपाययोजनेसाठी बोरी
प्रकल्प अहवालाच्या तरतूदीनुसार संदर्भाधीन क्र. 1 ते 3 अन्वये अमळनेर नगरपरिषद, अमळनेरसाठी 18.80 दलघफु पाणी प्रकल्पातून उचलण्यासाठी बोरी प्रकल्पाच्या जलनियोजनातील तरतूदीनुसार
पाणी आरक्षणासाठी जिल्हास्तरीय आकस्मित पाणी निश्चिती समितीने करावयाचे बिंगर सिंचन
आरक्षण बैठकीत अमळनेर नगरपरिषद,अमळनेर आणि पारोळा शहरासह नदीकाठावरील गावांसाठी पाणी आरक्षित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button