महागाई वाढल्याने केंद्र सरकार विरोधात महिला काँग्रेसचे निदर्शने
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : इंधन व महागाई विरोधात औरंगाबाद शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी तर्फे निदर्शने करून जिल्ह्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच गॅसचर दर वाढल्यामुळे संतप्त महिलांच्या वतीने शेणाच्या गौऱ्याचे पार्सल केंद्रसरकारला पाठवन्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश महिला कमिटीच्या महासचिव तसेच औरंगाबाद शहराच्या निरीक्षक सरोज मसलगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळ पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस व खाद्य तेल यांच्या दरवाढी मुळे जनता त्रस्त आहे इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आम्ही सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करत आंदोलन केले. असे मसलगे यांनी सांगितले.
यावेळी सीमा थोरात सुनीता तायडे, मीनाक्षी बोर्डे, अनुसुचित विभागाच्या प्रतिनिधी विजया भोसले, अरुणा लांडगे, अनिता भंडारी, उज्वला दत्त, छाया मोडेकर, स्वाती सर्वदे, मंजू लोखंडे , सुमन काम्बले उपस्थिति होत्या.






