Chandwad

चांदवडला वरचे गावातील गटारी दुरुस्ती व औषध फवारणी बाबत निवेदन,नवीन मुख्याधिकारी यांचेकडून नागरिकांना कामाच्या अपेक्षा

चांदवडला वरचे गावातील गटारी दुरुस्ती व औषध फवारणी बाबत निवेदन,नवीन मुख्याधिकारी यांचेकडून नागरिकांना कामाच्या अपेक्षा

उदय वायकोळे चांदवड

चांदवड शहरातील नगरपरिषद हद्दीतील वरचे गावातील रहिवाश्यांनी आज चांदवड नगरपरिषद मुख्याधिकारी श्री ऋषिकेश पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.यात नमूद केले आहे की वरचे गावातील जैन मंदिर ते शनीमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची व गटारींची दुरवस्था झालेली आहे.रस्त्यात जागोजागी खड्डे पडून चालणे जिकिरीचे झाले आहे तसेच गटारींची कठडे तुटलेले असून ते दुरुस्ती करणे गरजेचे आहे.या परिसरातील विद्यार्थी, नागरिक यांची याच रस्त्याने वर्दळ असल्याने अपघात होऊ शकतात तसेच फुटलेल्या गटारींमुळे दुर्गंधी पसरत आहे.शहरात डासांच्या औषध फवारण्या आवश्यक असून स्वछता विभागाने तातडीने फवारण्या सुरू करणे गरजेचे आहे अशी कैफियत नागरिकांनी मुख्याधिकारी यांचेकडे मांडली.
यावेळी महेश खंदारे,बाळा पाडवी, विशाल ललवाणी,गणेश कुमावत,निखिल मोरे आदी उपस्थित होते. चांदवड नगरपरिषद याअगोदर असलेले मुख्याधिकारी श्री कदम यांना वारंवार निवेदन देऊनही मागण्या पूर्ण होत नव्हत्या,याबाबत श्री शांताराम घुले या नागरिकाने कदम यांचेवर शिस्तभंग कारवाई होणेसाठी मा जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांचेकडे पाठपुरावा सुद्धा केला होता,असो आता नवीन मुख्याधिकारी श्री पाटील यांचेकडून शहरातील नागरिकांना सोयीसुविधा पुरविणेबाबत अपेक्षा असल्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button