AmalnerMaharashtra

?? माफीनामा…पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संदर्भात चुकीची बातमी प्रकाशित केल्या बद्दल

?? माफीनामा…पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संदर्भात चुकीची बातमी प्रकाशित केल्या बद्दल

अमळनेर

मी प्रा जयश्री दाभाडे ठोस प्रहार ऑनलाईन पोर्टल ची संपादक हा माफीनामा प्रसिद्ध करीत आहे यासंदर्भातील सखोल माहिती अशी की दि 1 मे 2020 रोजी मा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शूज घालून झेंडावंदन केले अशी बातमी मी दि 1 मे रोजी प्रकाशित केली होती. यासंदर्भात मी आज या माफी नाम्याच्या निमित्ताने पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांची जाहीर माफी मागून जी बातमी शूज घालुन झेंडा वंदन करण्याची प्रकाशित केली होती त्यामागे मा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची बदनामी व्हावी किंवा त्यांचा अपमान व्हावा असा उद्देश नव्हता.तर एका शिवसैनका कडून जी माझ्या सारखी सर्व सामान्य माणसे अपेक्षा करतात की झेंडावंदन करताना मा ना पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब शूज काढून झेंडावंदन करून नवीन पायंडा पाडला असता. असो माझ्या बातमीच्या माध्यमातून जर मा ना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मन दुखावले गेले असेल तर मी त्यांची जाहीर माफी मागत आहे.

तसेच वरील बातमी त्वरित डिलीट केली असून मा ना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना विनंती की भावनेच्या भरात 1 मे महाराष्ट्र दिनाचा अभिमान वाटत असल्यामुळे माझ्या कडून ही बातमी प्रकाशित झाली तरी याबाबत कोणताही मनात शंका न ठेवता पहिली चूक म्हणून कृपया माफ करावे ही विनंती…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button