Amalner

? सत्यकथा..दारू अड्डा आणि तो “घायाळ”…

? दारू अड्डा आणि तो “घायाळ”…

प्रा जयश्री दाभाडे

आटपाट नगर … या नगराचे नाव ही मोठं सुंदर निर्मळ पाणी अश्या अर्थाचे..या नगरात अनेक छोटी छोटी गावे…. गावांमध्ये सतत चालणारे अंतर्गत राजकारण, समाजकारण आणि नेहमी प्रमाणे आपसातील वाद, प्रतिवाद….प्रतिक्रिया, भांडणे,कोर्ट कचेऱ्या सगळं कसं एकदम परफेक्ट ग्रामीण गावाचं उत्तम उदा.

गाव आलं म्हणजे अनेक छोटे मोठे उद्योग धंदे त्यातही दारूचा धंदा जोमात…(कारण नुकतेच शासनाच्या धोरणामुळे दारू हा अर्थ व्यवस्थेचा भक्कम कणा आहे हे सिद्ध झालेलं…) एकूणच काय तर आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे… असं गावाचं वातावरण…

अचानक एक “घायाळ” गावात येतो…कधी पत्ते तर कधी हागायचं दबड जप्त करतो..गाव बिथरत…हागणे आमचा जन्म सिद्ध हक्क आणि त्यावर ही बंदी??? रात्री अपरात्री घायाळ मुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो…घायाळची आयाळ कधी हाती लागेल याची गावकरी वाट पाहू लागतात…पण गावातील दुफळी चे राजकारण आणि आपसातील वाद च इतके जोमात असतात की परका व्यक्ती येऊन आपल्यातच वाद निर्माण करत आहे…. दुफळी अधिक वाढवत आहे…फोटो सेशन करून चमकोगिरी करत आहे… आपल्याच गावातील लोकांच्या विरोधात आपल्याच लोंकांचा वापर करून घेत आहे हे गावकऱ्यांच्या लक्षातच येत नाही.. विशेष म्हणजे हा खलनायक घायाळ ठराविक ठिकाणीच जाऊन चमकोगिरी करतो जे त्याची स्तुती करतात हरभऱ्याच्या झाडावर चढवतात तिथेच घायाळ जातो आणि लोकांची दिशाभूल करून स्वतः ची खराब आणि विस्कळीत मानसिकता अंजारून गोंजारून घेतो…मराठी चित्रपटात जसा खलनायक विचित्र सायको फेम असतो तसा…

अचानक गावात वाईट स्थिती निर्माण होते.. ह्या स्थितीचा घायाळ परिपूर्ण फायदा उचलतो…परिसरातील दारू अड्डे बंद करून सामान ताब्यात घेऊन आपल्याच स्तुती करणाऱ्या एका सदस्याकडे ठेवतो…तो सदस्य पण दारू चा व्यवसाय करणारा असतो..!तो स्वतःच त्या सामानाचा गैरवापर करत दारू विकु लागतो…हात मजुरी करून उदरनिर्वाह करणारे गावातील गरजू आणि गरीब व्यावसायिक हवालदिल होतात आणि संबंधित व्यक्तीला विरोध करतात.

आणि एक दिवस अचानक घायाळ आणि संबंधित व्यक्ती अचानक एका घरात घुसतात…स्त्री एकटी असते….गावातील घरांना कमी दरवाजे असतात..स्त्री अंघोळीस गेलेली असते…घायाळ आणि संबंधित व्यक्ती कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता घरात घुसतो… महिलेला मारहाण केली जाते… ती स्त्री बिचारी घाबरते आणि घरातच पुरुष मंडळी ची वाट पाहत बसते..

घरात पुरुष मंडळी नसतांना जाणे आणि महिलेला धमकावणे यात घायाळ यशस्वी होतो आणि 1980- 90 च्या दशकातील मराठी खलनायका प्रमाणे दीड इंचा ची छाती 40 इंचाची करून फुशारक्या मारतो….बाई बिचारी कळवळते पण घायाळ हा मानसिक आजारी असल्याने त्याला काही फरक पडत नाही….तो एखादया खलनायका प्रमाणे अक्राळ विक्राळ पणे हसत निघून जातो….

गावाच्या राजकारणात अनेक बदल दिवसागणिक होत असतात…याची जाणीव घायाळ ला नसते…लवकरच त्याचा बँड वाजणार असतो आणि तो कसा वाजतो हे आपण ह्या लघु कथे च्या दुसऱ्या टप्प्यात पाहणार आहोत….

तेंव्हा लवकरच आपल्या भेटीला येईल कहाणीचा दुसरा भाग घेऊन तो पर्यंत घरी रहा सुरक्षित रहा….आणि आमच्या लघुकथा वाचून आम्हांला प्रतिक्रिया कळवा…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button