Indapur

“कोरोना” पार्श्वभूमीवर इंदापूर नगरपरिषदेची बैठक

“कोरोना” पार्श्वभूमीवर इंदापूर नगरपरिषदेची बैठक

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे : इंदापूर नगर परिषदेने देशामध्ये सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरस या रोगाच्या प्रतिबंधासाठी शहरातील सर्व खाजगी डॉक्टर, सरकारी डॉक्टर, पोलीस अधिकारी, शाळा व महाविद्यालयातील शिक्षक एसटी महामंडळ अधिकारी यांची संयुक्त बैठक नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

या बैठकीमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचा आढावा घेतला. शहरामध्ये आठवडा बाजार व मंडई बंद करण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले. शहरांमध्ये होणारे लग्न, समारंभ, वाढदिवस, व्यायाम शाळा, धार्मिक कार्यक्रम, शाळा व महाविद्यालय हे बंद ठेवणार असल्याचे सांगितले. शहरांमध्ये सर्व नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी तंतोतंत करावी याबाबत सूचना दिल्या. गर्दीच्या ठिकाणी नोटिसा बजावून ती कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी सर्व कर्मचारी अधिकारी यांना याबाबत सूचना दिल्या व शहरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. इंदापूर पोलिस स्टेशनचे नूतन अधिकारी नारायण सारंगकर यांनी ही शहरांमध्ये होणारे समारंभ, कार्यक्रम,धार्मिक कार्यक्रमावर बंदी घालण्याचा सूचना दिल्या.या बैठकीसाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, आरोग्य सभापती उषा स्वामी, डॉ.शिवाजी वीर, डॉ. नामदेव गार्डे , एसटी महामंडळाचे मस्के साहेब उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button