एरंडोल येथील दिव्यांग बंधू भगिनी योजनांपासून वंचित ..प्रहार अपंग क्रांती द्वारे दिव्यांग भगिनीची भेट
नूर खान
एकेकाळी एरंडोल तालुक्यातील फरकांडे गाव हलत्या मनोर्यासाठी ऐतिहासिक प्रसिद्ध म्हणून ओळखले जात होते. परंतु अशा ऐतिहासिक प्रसिद्ध गावात मात्र दिव्यांगा ची दयनीय अवस्था आज पाहावयास मिळते. या गावात चाळीस ते पन्नास दिव्यांग असून या दिव्यांगांना शासनाच्या कुठल्याच योजनाचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही.

गावातील सर्व दिव्यांगांची नोंद एरंडोल प्रहार अपंग क्रांती आंदोलन चे तालुकाध्यक्ष योगेश चौधरी यांनी स्वतः गावातील दिव्यांगांची प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावात थोडा फेरफटका मारत असताना गावात एक आशा गोरख भिल नावाची दिव्यांग महिला दिसली. त्या महिलेला आजही गावात राहण्यासाठी व्यवस्थित घर नाही. गावातील ग्रामपंचायतीच्या जागेवर रस्त्याच्या कडेला छोटी झोपडी बनवून आपल्या लहान दोन मुलींसह राहत आहे.

दिव्यांग असल्याकारणाने पतीनेही तिची साथ सोडून गावातून पलायन केले. आज या महिलेला स्वतःचे रेशन कार्ड सुद्धा नाही. माननीय पंतप्रधान 2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचे आश्वासन दिलेले असताना देखील मात्र ग्रामीण भागातील दिव्यांगांना पाच टक्के निधी व घरकुल या योजनेपासून वंचित ठेवले जाते. शेवटी या महिलेची शासनाला कळकळीची विनंती करते कि मला ग्रामपंचायतीकडून घरकुल योजनेत घर मिळावे अशी तिची शासनाला आर्त हाक आहे.






