मुख्यमंत्री साह्यता निधीचे स्वतंत्र कार्यालय पुणे येथे उभारावे — अंकिता हर्षवर्धन पाटील
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे– मुख्यमंत्री वैद्यकीय साह्यता निधी कार्यालय मार्फत महाराष्ट्रातील लाखो रुग्णांना आर्थिक सहाय्य केले जाते. मुंबई येथील मंत्रालयमध्ये स्वतंत्र असलेले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आहे. या कार्यालयामध्ये महाराष्ट्रातील हजारो रुग्ण रोज कार्यालयांमध्ये प्रस्ताव देतात या प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी एक स्वतंत्र समिती काम करते. पुणे जिल्ह्यातूनच पण हजारो रुग्ण या योजनेचा लाभ घेतात पण सर्व रुग्णांना मुंबई येथे जाऊन हे प्रस्ताव सादर करणे शक्य होत नाही. . याच साठी मुख्यमंत्री सहायता निधी चे एक स्वतंत्र कार्यालय पुणे जिल्ह्यासाठी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पुणे जिल्हा परिषद येथे सुरू करावे यासाठी आज पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या संचालीका कु. अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी पुणेचे मा. जिल्हाधिकारी श्री.नवल किशोर राम साहेब यांना भेटून निवेदन दिले व चर्चा केली. तसेच लवकरच आदरणीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांना ही भेटून या संदर्भात त्या मागणी करणार आहे. मा. जिल्हाधिकारी यांनी ही या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद दिला.
हे कार्यालय पुणे येथे सुरू झाल्यास पुणे जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांना त्यांचे प्रस्ताव तेथे जमा कारण करण्यासाठी सोयीस्कर होईल . ह्या कार्यासाठी एक स्वतंत्रही समिती ही स्थापन करून आठवड्याच्या आठवड्याला जमा झालेले सगळे प्रस्ताव मुंबई येथील मुख्य मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात पाठवण्यात येतील अशी सोय करावी व गरजू रुग्णांना योग्य ती मदत लवकरात लवकर मिळावी जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांना मुंबईचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत, अशी मागणी अंकिता पाटील यांनी
केली आहे.






