Amalner

?️अमळनेर कट्टा.. आणि प्रतीक्षा GM ची..!इंतहां हो गयी इंतजार की..!

?️अमळनेर कट्टा.. आणि प्रतीक्षा GM ची..!

अमळनेर येथे आज सकाळी 10 वाजता रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर म्हणजेच GM यांचे आगमन होणार आहे अशी माहिती मिळाली होती. आता दुपारचे 12 वाजले असून अजूनही GM यांचा अमळनेर रेल्वे स्थानकात पत्ता नाही याठिकाणी अनेक लोक त्यांची प्रतीक्षा करत असून कोणीही योग्य वेळ सांगायला तयार नाही.संपुर्ण रेल्वे स्टाफ,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी,निवेदन देणारे शेतकरी इ गेल्या दोन तासांपासून वाट पाहत आहेत. सर्व प्रतिष्ठित नागरिक पत्रकार आपले सर्व काम सोडून संबधित अधिकाऱ्याची वाट पाहत असून अब कब खतम होगा ये इंतजार अशी चर्चा रेल्वे स्थानकात सुरू आहे..!

रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर संजय रॉय यांनी GM च्या शेड्युल बद्दल बोलण्यास नकार दिला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button