Bollywood

नोरा फतेहीचे बोल्ड अंदाजातील गाणे प्रदर्शित..!सोशल मीडियावर व्हायरल..!

नोरा फतेहीचे बोल्ड अंदाजातील गाणे प्रदर्शित..!सोशल मीडियावर व्हायरल..!

मुंबई बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते २ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.अॅक्शनपट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यापाठोपाठ आता चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

सत्य मेव जयते २ या चित्रपटातील कुसू कुसू हे गाणे प्रदर्शित झाले आहे. यात नोरा फतेहीचा डान्स आणि बोल्ड अंदाज पाहण्यासारखा आहे. हे गाणे आता पर्यंत ५० लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तसेच या गाण्याला ३ लाख लोकांनी लाइक केले आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते २ हा चित्रपट २५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांना हा चित्रपट चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी करत असून जॉनसोबतच अभिनेता मनोज बाजपेयीदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच दिव्या खोसला कुमार, मनोज बाजपेयी, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. सत्यमेव जयते 2 हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सत्यमेव जयतेचा पुढचा भाग आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button