?️अमळनेर कट्टा…अमळनेर येथे वाळू माफियावर 353 गुन्हा दाखल..आज दिनांक 23.04.2021 रोजी मी तसेच आमचे पातोंडा बिट चे मंडळ अधिकारी शिवलाल महादु गवळी रा. धुळे असे मोजे सायखेडा येथे कार्यालययीन कामकाजासाठी सकाळी 10.00 वाजता गेलो होतो. कार्यालयीन कामकाज आटोपुन सतीश अशोक शिंदे व मंडळ अधिकारी गवळी साहेब असे दुपारी 15.30 वाजता कार्यालयातुन अमळनेर कड़े मोटार सायकलीने जात असतांना
पातोंडा गावाजवळ पातोंडा गावातील माहिजी देवी मंदीराजवळ आम्हास एक वाळुने भरलेले ट्रक्टर दिसले म्हणुन मी तसेच मंडळ अधिकारी ट्रॉलीमध्ये वाळू भरलेली आढळली त्यावेळी सदर ट्रक्टरवरील चालकास आम्ही गौण खनिज वाळु वाहतुकी बाबत पास चलन अगर परवाना आहे अगर कसे असे विचारले असता सदर ट्रक्टर चालक याने सांगितले की, माझ्याकडेस याळू वाहतुकीबाबत कोणताही चलन अगर परवाना नाही, त्यावरुन सदर ट्रक्टरच्या ट्रॉलीमध्ये अनाधिकृत रित्या गौण खनिज एक ब्रास वाळु भरुन तो अवैधरित्या वाहतुक करीत असतांना मिळून आल्याने
चालकांस सदरचे ट्रक्टर हे वाळुसह अमळनेर येथे तलाठी कार्यालयात नेण्यास सांगितले परंतु सदर ट्रक्टर चालक याने त्याचे ताब्यातील वाळूसह नांद्री पर्यंत चालवित आणले नांद्री येथे एक इसम आला व तो आम्हांस म्हणाला की, हे वाळू चे भरलेले ट्रक्टर माझे मालकीचे असुन माझे नाव नागो वामन कोळी रा. जळोद ता. अमळनेर असे असुन सदर ट्रक्टर तुम्ही कसे काय पकडले असे अरेरावीच्या भाषेत बोलत होता आणि मला तसेच मंडळ अधिकारी शिवलाल गवळी अशांना नागो वामन कोळी याने शिवीगाळ करुन दोघांना धक्काबुक्की केली. त्यावेळी त्यांस आम्ही ट्रक्टर रोडाच्या बाजुला घेण्यास सांगितले.आम्ही पोलीस स्टेशनला फोन त्यांचेकडुन संरक्षण मागुन घेतले.गौण खनिज वाळूने भरलले ट्रॅकटर हे नागो वामन कोळी रा. जळोद ता. अमळनेर हा पळवुन घेवुन गेला. तरी आज दिनांक 23.04.2021 रोजी दुपारी 15.30 वाजता मी तसेच मंडळअधिकारी शिवलाल महादु गवळी असे सावखेडद्यावरुन पातोंडा येथे मो.सा.ने जात असतांना एक ट्रक्टर निळ्या
रंगाचे विना नंबरचे त्याचा चेसीस नं. MBLAU52AHIKTK13158 असे असलेले एक ब्रास वाळू विना परवाना पावती न घेता अवैधरित्या मिळून आल्याने त्यांस रोडाच्या बाजुला थांबवुन अमळनेर तहलास कार्यालय, अमळनेर येथे वाळूसह घेवुन जाण्यास सांगितले असता,आरोपी क्र. 1) दैवत वाल्मीक कोळी रा. जळोद ता. अमळनेर याने टाटर मालक 2) नागो बामन कोळी रा. जळोद ता. अमळनेर यांस नांद्री येथे बोलाऊन शिवीगाळ व धक्काबुक्की करून आम्ही करीत असलेल्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करुन शासकीय कर्मचाऱ्यांच्या संमतीशिवाय अवैधरित्या वाळुने भरलेले ट्रक्टर ट्रासह सदर ठिकाणाहुन पळयुन घेवुन गेला म्हणून त्यांचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे.अमळनेर पोलीस ठाण्यात 353,379 व 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एस आय नरसिंह वाघ हे करत आहेत.फिर्याद तलाठी सतीश शिंदे यांनी दिली आहे.







