Amalner

?️अमळनेर कट्टा..स्टेट बँक 4 ते 5 दिवस राहणार बंद..!लागलेल्या आगीमुळे साधारण पणे दिड लाखांचे नुकसान…!

?️अमळनेर कट्टा..स्टेट बँक 4 ते 5 दिवस राहणार बंद..!लागलेल्या आगीमुळे साधारण पणे दिड लाखांचे नुकसान…!

अमळनेर येथे काल रात्री शॉर्ट सर्किट मुळे स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अमळनेर शाखेत आग लागली होती. अचानक पणे धूर निघताना दिसल्याने घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले आणि सदर आगी वर नियंत्रण मिळवण्यात आले होते. आज शाखा प्रबंधक नितीन वासनिक यांनी आग शॉर्ट सर्किट झाल्या मुळे लागली .सदर घटनेत साधारणपणे दिड लाखांचे नुकसान झाले असून यात 1 लाखांचे संगणक आणि 50 हजार रु चे फर्निचर आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. आज अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पंचनामा करणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. जवळपास7 ते 8 संगणक प्रणाली खराब झाली असून जवळपास सर्वच वीज यंत्रणा बिघडली असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही स्वरूपाची कागदपत्रे नष्ट झाली नसून पैसे व इतर सर्व साहित्य सुरक्षित आहे.सर्व प्रणाली सुरळीत सुरू होण्यासाठी 4 ते 5 दिवस लागतील त्यामुळे या कालावधीत बँक बंद राहील अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
झालेल्या घटनेच्या चौकशी साठी मुख्य प्रबंधक रामदास पाटील,जळगाव, रवींद्र सराडे,जळगांव आणि दुर्गेश दुबे झोनल अधिकारी नाशिक यांनी बँकेला भेट दिली आणि सर्व स्थिती जाणून घेतली आहे. सर्व नुकसान ग्रस्त साहित्याची पूर्तता झोनल कार्यालयांकडून होणार असल्याने थोडा कालावधी लागेल असे वासनिक यांनी सांगितले आहे.
दरम्यान काल रात्री ड्युटी कर्मचारी दिलीप पाटील हे कामावर हजर होते आणि त्यांना धूर निघत असल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले.तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने खिडक्यांचे काच फोडून धूर कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु वायरी जळत असल्याने धुराचे प्रमाण इतके जास्त होते की समोरचे काहीच दिसत नव्हते त्यामुळे काम करणेही मुश्किल झाले होते. असे ही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button