Maharashtra

फैजपूर मध्ये सात दिवस जनता कर्फ्यू फक्त दवाखाने मेडिकल दुग्ध डेअरी सुरू राहणार

फैजपूर मध्ये सात दिवस जनता कर्फ्यू
फक्त दवाखाने,मेडिकल ,दुग्ध डेअरी सुरू राहणार

प्रतिनिधी सलीम पिंजारी

शहरात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे.व 4 बाधित रुग्णांचा मृत्यू ही झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ५८ झाली असून अशी बिकट परिस्थिती असताना शहरात फिजिकल ड़िस्टनसिंग चे पालन केले जात नाही असे दिसून येत आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात जनता कर्फ्यूची नितांत आवश्यकता असल्याने दि.१4 ते 20 असे सात दिवस कडकडीत जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या बाबत येथील नगरपालिका सभागृहात सर्व पक्षीय संघटना,नागरिकांची बैठक पार पडली, त्यात हा निर्णय झाला.
बैठकीला नगरसेवक, पत्रकार, संघटना, लोकप्रतिनिधी सर्वपक्षीय पदाधिकारी वाढत्या कोरोनाच्या वाढत्या महामारी च्या आलेल्या संकटाला कसे थांबवता येईल यावर विचारविनिमय करण्यासाठी सर्वपक्षीय व संघटनांची बैठक घेऊन नियोजन करण्यात आले.
शहरात कोरोनाने कहर केला आहे.एकमेकाच्या संपर्कातून हा रोग वाढतो आहे. हे टाळायचे असेल तर अशा या बिकट संकटात एकमेकाच्या संपर्कात येऊ नये.फिजिकल डिस्टन्सिंग चे नियम पाळावे.आपला परिवार व आपल्या शहराचे आरोग्य रक्षण आपणच करू शकतो. आपण सर्व नागरिक मिळून जनता कर्फ्यू लावून शहर बंद करूनच सुरक्षित राहू शकतो.त्यासाठी आपण सर्वांनी मिळून महसूलप्रशासन, पोलीस प्रशासन ,नगरपालिकाप्रशासन यांच्या सहकार्याने नियोजन करून जनता कर्फ्यू पाळण्याची गरज आहे,यावर सर्वांचे एकमत झाले. दि १4 ते 20 असे सात दिवस शहरात कडकडीत बंद ठेवण्यात येईल. बंद मध्ये फक्त दवाखाने,मेडिकल, दुध व्यवसाय जनता कर्फ्यू काळात फक्त सुरू राहतील.बाकी सर्व दुकाने ,किराणा,भाजीपाला,मोबाईल दुकाने व इतर सर्व दुकाने व्यापारी प्रतिष्ठाने सात दिवस संपूर्ण बंद राहतील.
जनता कर्फ्यु चे निवेदन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले,मुख्याधिकारी किशोर चव्हाण ,सहायक पोलिस निरीक्षक वानखेडे यांना देण्यात आले.या जनता कर्फ्युला प्रशासन सहकार्य करेल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.तर व्यवसायिक व जनतेनेही सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीत दि १४ ते २०जुलै असा सात दिवसांचा आपल्या फैजपूर शहरात जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय सोमवारी पालिका सभागृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
यावेळी महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज,फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी भाजप शहराध्यक्ष अनंत नेहते,राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष अन्वर खाटिक, रियाज मेंबर, नगरसेवक भाजप गटनेते मिलींद वाघुळदे, कॉंग्रेस गटनेते कलिमभाई,रशिद मेंबर,कुर्बान मेंबर, हेमरज चौधरी,इरफान मेंबर,रघुनाथ कुंभार, केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे,देवेंद्र साळी,रईस मेंबर पत्रकार वासुदेव सरोदे ,योगेश सोनवणे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button