क्रमशःगट क्र 1313 अवैध बांधकाम आणि बेकायदेशीर गौण खनिज साठा याबद्दल चौकशी व्हावी… शिवसेना तालुकाध्यक्ष यांची मागणी
अमळनेर नगरपरिषद मुख्याधिकारी करत आहे दुर्लक्ष
अमळनेर येथील गट क्र 1313 या जागेचे एन ए ले आऊट परवानगी आणि गट क्र 1313 मध्ये अवैध गौण खनिज मुरूम,पिवळी माती ,दगड आणि वाळू उपयोगात येत असल्या बाबतची तक्रार विजय काशिराम पाटील तालुका अध्यक्ष शिवसेना यांनी केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की कसबे अमळनेर येथील बपश्चिम भागात रवी नगरच्या मागच्या बाजूस गट क्र 1313 या जागेवर बांधकाम सुरू आहे. या बांधकामास एन ए लेआऊट ची परवानगी नाही.परवानगी नसताना पाया पर्यंत चे बांधकाम झालेले आहे. हे बेकायदा बांधकाम असून नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी याकडे सोईस्कर पणे दुर्लक्ष केले आहे.
नागरिकांच्या तक्रारीवरून या बेकायदेशीर बांधकाम थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे.
याच गट क्र 1313 वरील बेकायदेशीर बांधकाम करण्यासाठी व्यावसायिक याने अवैध रित्या प्रचंड प्रमाणात वाळू,मुरूम, पिवळी माती,दगड,डबर इ गौण खनिज चा बेकायदेशीर साठा केला आहे. एका बाजूला प्रशासन अवैध गौण खनिज उपसा आणि साठा संदर्भात कडक उपाययोजना राबवित असताना दुसऱ्या बाजूला एक बांधकाम व्यावसायिक एवढया मोठ्या प्रमाणात विना परवाना अवैध रित्या गौण खनिज साठा करून ठेवत आहे.गौण खनिज टाकण्याचे चलन व परवाना या बाबत चौकशी केली जावी अशी मागणी पत्रा द्वारे मा ना बाळासाहेब थोरात महसूल मंत्री महा राज्य मंत्रालय यांच्या कडे करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मा जिल्हाधिकारी जळगांव, मा मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद यांना देण्यात आल्या आहेत.
आता या विषयावर प्रशासन काय पाऊल उचलते ?संबंधित व्यावसायिकाकडून दंड वसूल करण्यात येईल का?शासकीय नियमानुसार कार्यवाही होईल का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कारण सदर व्यावसायिक हे शहरातील नामांकित व्यक्ती असून धनवान देखील आहेत.लक्ष्मीचा जोर चालतो की नियमांचा हे पाहणे महत्वपुर्ण ठरणार आहे.






