पाकिजा पटेल यांना राष्ट्रीय मदर टेरेसा समाजसेविका पुरस्कार
पारोळा प्रतिनिधी- कमलेश चौधरी.
राजवड येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका पाकिजा उस्मान पटेल यांना मानस चॅरिटेबल ट्रस्ट अहमदाबाद या संस्थेमार्फत राष्ट्रीय मदर टेरेसा समाजसेविका पुरस्कार देण्यात आला.
या मानस संस्थेमार्फत त्यांना इंडियन अचिव्हर्स अवार्ड, बेस्ट सोशल सर्विस अवार्ड, एक्सलन्स इन सोशल वर्क अवार्ड आणि इंटरनॅशनल ब्रँड आयकॉन अवार्ड या राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
पाकिजा पटेल यांच्या शैक्षणिक , सामाजिक ,राष्ट्रीय , संघटनात्मक कार्याची दखल घेत हे पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आले.
कोरोना काळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. तसेच शासनाच्या प्रत्येक योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवण्यात त्या नेहमी अग्रेसर असतात. आदिवासी विद्यार्थिनी चंदा भिल हिची गो गर्ल्स गो या स्पर्धेत जिल्ह्यावर निवड झाली होती.
शैक्षणिक विकासासोबत राजवड शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी कसा पारंगत व्हावा यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून कसोशीने प्रयत्न केले जातात. दीक्षा ॲप्स चा वापर करत राजवड शाळेचे विद्यार्थी देखील तंत्रस्नेही झाले आहेत.
राष्ट्रीय मदर टेरेसा समाजसेविका पुरस्कार सहित अन्य पुरस्काराने राजवड शाळेचे नाव देशात उज्ज्वल केले आहे.या यशा बद्दल पाकिजा पटेल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.






