अमळनेर नगरपरिषदेत आंधळे दळते आणि कुत्रं पीठ खाते अशी स्थिती..माहिती अधिकारी म्हणून सही करतात शिपाई..!
माहिती अधिकारी म्हणून सही करणारा व अधिकारी म्हणून तोतयागिरी करणाऱ्या शिपाई (मुकादम ) राधेश्याम रमेशचंद्र अग्रवाल यांचे विरुद्ध कलम ४१९,४२०, ४६३, ४६५ भा.द.वि. खाली अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचे व शिस्तभंगची कडक कारवाई होणे बदल तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की राधेश्याम रमेशचंद्र अग्रवाल याने माहिती अधिकारी म्हणून तोतयागिरी करून स्वतः च्या सहीचे पत्र दिले आहे.
तक्रारदार यांनी दि. २०/०७/२०२० रोजी अमळनेर नगर परिषदे यांचेकडून माहिती अधिकार कायद्याखाली जन माहिती अधिकारी यांचे कडून सार्वजनिक हिता करिता माहिती मागितली होती.
दि. १४/०९/२०२० रोजी आपल्या नगर परिषद अमळनेर यांचे कडून जा.क्र. वशी
13/340/2020 या पत्राद्वारे राधेश्याम रमेशचंद्र अग्रवाल याने जनमाहिती अधिकारी
अतिक्रमण विभागाचे प्रमुख बांधकाम विभाग न. प.अमळनेर म्हणून सही करून सदरचे लेखी पत्र तक्रारदार ला दिले होते.तदनंतर याबाबत माहिती घेऊन खात्री केली असता राधेश्याम रमेशचंद्र अग्रवाल शिपाई ( मुकादम) वर्ग -४ च्या कर्मचारी असुन त्याला जनमाहिती अधिकारी म्हणून सही करण्याचा अधिकार नसतांना त्याने त्याचे सहीचे पत्र देऊन तोतयागिरी करून फसवणूक केली नाहीतर त्याने बनावट पत्र तयार केले आहे. जे कलम कलम ४१९ ,४२०,४६३, ४६५ भा. द. वि. खाली दखलपात्र व दंडनीय गुन्हे आहे. म्हणून त्या अधिकाराखाली कार्यवाही होणे करिता सदरच्या तक्रार अर्ज देणे भाग झाले आहे.
तरी राधेश्याम रमेशचंद्र अग्रवाल यांचे विरुद्ध वर नमूद केल्या प्रमाणे ३ दिवासाचे आत कार्यवाही करण्यात यावी . अन्यथा त्यांचे विरुद्ध कलम ३९ फौ. प्र. संहितेनुसार मा. न्यायालयात दाद मागणे भाग पडेल.






