Pune

कारची दुचाकीला धडक; 65 वर्षीय नागरिकाचा मृत्यू

कारची दुचाकीला धडक; 65 वर्षीय नागरिकाचा मृत्यू

दत्ता पारेकर पुणे

पुणे : इंदापूर शहरातील सोलापूर-पूणे हायवे रोडवर शुक्रवारी 65 वर्षीय जेष्ठ नागरिक यांच्या दुचाकीला समोरून येणार्‍या कारने धडक दिल्याने अपघात झाला होता. अपघातातील गंभीर जखमीला अकलुज येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना जखमीचा मृत्यु झाल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दिली.

बापुराव श्रीरंग आवटे (वय 65, रा. इंदापूर, जि.पूणे) असे अपघातात मृृत्यु झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबतची माहिती दिपक बाळासाहेब जाधव (वय 38, रा. गलांडवाडी नं. १ ता.इंदापूर, जि.पूणे) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

बाबुराव आवटे हे शुक्रवार दि.9 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वा.चे सुमारास इंदापूर शहरातील जुना सोलापूर-पूणे हायवे रोडने TVS शोरूम समोरून दुचाकीवरून जात असताना सोमोरून येणार्‍या कारने समोरून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचेवर अकलुज- संग्रामनगर येथील आश्विनी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मत्यु झाला ,पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button